Call your MP – Marathi Sample Script

Marathi

“आपल्या लोकप्रतिनिधिंशी बोला” या शक्तीच्या मोहिमेसाठी काही नमुना वाक्ये:
वेळ: दिनांक २७ डिसेंबर – संध्याकाळी ७ ते ९:३०

जेव्हा आपण संसद वा विधानसभा सदस्यांना फोन कराल, तेव्हा त्यांनी फोन उचलल्यावर खालील नमुना वाक्ये आपण बोलू शकता:

नमस्कार माननीय <लोकप्रतिनिधीचे नाव> जी/साहेब/मॅडम,

माझं नाव <आपले नाव > आहे. मी आपल्याला शक्ती चळवळीच्या “आपल्या लोकप्रतिनिधिंशी बोला” – या राष्ट्रीय मोहिमेकरिता फोन केला आहे. याद्वारे, स्त्रियांच्या  ३३% आरक्षणाचे विधेयक संसदेमध्ये चर्चेसाठी आणावे, यासाठी आम्ही आपल्याला विनंती करीत आहोत. कृपया या विधेयकाला पटलावर आणण्यासाठी व ते पारित करण्यासाठी आपण जरूर प्रयत्न करावेत. जवळपास ७० वर्षे संसदेत केवळ १०% स्त्रियाच आहेत हे सर्वश्रुतच आहे. या लोकसभेतील आताचे संसदेचे हे शेवटचे अधिवेशन असेल, त्यामुळे हि संधी गमावून चालणार नाही.

आपण जनतेने निडवून दिलेले प्रतिनिधी असल्याने, आम्ही आपणास हि विनंती करतो कि या लोकांच्या मागण्यांना संसदेत व्यासपीठ मिळवून द्यावे. आमची मागणी एवढीच आहे, कि स्त्रियांच्या संसदेतील ३३% आरक्षणाचा मार्ग याच अधिवेशनात मोकळा व्हावा. आपण या विधेयकाला पाठिंबा देऊ इच्छिता व पुढील कार्यवाही करू शकता का? <हो/नाही उत्तरासाठी थांबा >             

आम्हाला आशा आहे कि आपण आमची मागणी संसदेत लावून धराल. आपण फोनवर हि दोन मिनिटे दिलीत त्याबद्दल धन्यवाद !!

लोकप्रतिनिधींचे वरील प्रश्नावरील उत्तर नोंदवून ठेवा (हो / नाही) आणि व्हॉट्सअप वा मेसेज करा – <लोकप्रतिनिधिचे नाव > Yes /No  +91 9341941945